Corporate Accounting-1 (English Medium + Marathi Instructions)
About Course
मुख्यतः SRTMU Nanded University नुसार च्या अभ्यासक्रमानुसार केंद्रित तसेच महाराष्ट्रातील इतरही काही विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमाला अनुसरून असलेल्या
बी. कॉम. द्वितीय वर्षाच्या सेमिस्टर 3 च्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्यासाठी
त्यांना विविध टेक्स्ट आधारित नोट्स, पीडीएफ फाइल्स, विडियोज इत्यादि गोष्टी घरूनच/कुठल्याही ठिकाणाहून इंटरनेट ने जोडलेल्या मोबाइल/कम्प्युटर/टॅब इत्यादि साधनांच्या सहाय्याने, अभ्यास, तयारी आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने पाहता याव्यात असा तयार करण्यात आलेला हा ऑनलाइन कोर्स आहे; तथापी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी या कोर्स चा वापर करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोग करून घेऊ शकतात.
प्रा. सचिन खंदारे सर शैक्षणिक वर्ष – 2025-26 दरम्यान विषय शिक्षक (Subject Teacher) म्हणून शिकवीत असतानाच हा ऑनलाइन कोर्स तयार केलेला असून,
सदरील कोर्स मध्ये English Medium मधून संपूर्ण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्यूशन्स आहेत. Theory (नोट्स) मात्र अगोदर इंग्रजी मधून व नंतर मराठी मधून अशा दोन्ही पद्धतीने दिल्या आहेत. सदरील संपूर्ण नोट्स या ज्ञानाचे वेगवेगळे ऑनलाइन-ऑफलाइन स्रोत , तसेच गरजेनुसार AI (Artificial Intelligence) वापरुन तयार केलेल्या आणि स्वयंनिर्मित अशा आहेत. (थोडक्यात, संपूर्ण मटेरियल ही Copy-paste नाही)
ज्या ज्या ठिकाणी विडियो सेशन्स/लेक्चर आहेत त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या विडियोज मध्ये माध्यम इंग्रजी च आहे पण मराठी मधून शिकविलेले आहे. (म्हणजेच Medium of instructions: Marathi वापरलेले आहे). त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम्सच्या सोल्यूशन्सचे लेखन ही इंग्रजीतूनच करावे असे अपेक्षित आहे. पण Theory मात्र विद्यार्थी-विद्यार्थीनी ही मराठी/इंग्रजीतून आत्मसात करून (परीक्षेतसुद्धा) लिहू शकतात.
Disclaimer / अस्वीकृती:
या कोर्स मध्ये काही चुका/त्रुटि इत्यादि असू शकतात, अशा चुका/त्रुटि इत्यादि च्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे कुठलेही शैक्षणिक/मार्क इत्यादि नुकसान झाल्यास संबंधित कोर्स तयार करणारा प्राध्यापण जबाबदार राहणार नाही हे लक्षात घेऊनच विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी या ऑनलाइन कोर्सचा आधार आपल्या परीक्षेसाठीची तयारी आणि अभ्यास यांच्यासाठी घ्यावा. एकंदरीत हा कोर्स फक्त आणि फक्त मार्गदर्शक म्हणून तयार केलेला आहे. अंतिम यश आणि मार्क पूर्णपणे परीक्षेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे लेखन आणि विद्यापीठाचे मूल्यांकन यांच्यावर अवलंबून आहे/असते.
या कोर्समध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी टाईप करून शंका/प्रश्न देखील विचारू शकतात ज्यामध्ये त्यांचे नाव कुठेही दिसत नाही.
Primarily according to the syllabus of S. R. T. M. University, Nanded as well as for other universities in Maharashtra.
B.Com. Second Year Semester III students, this online course has been created so that they can access various text-based notes, PDF files, videos, and other study materials from home or anywhere through internet-connected devices such as mobile phones, computers, tablets, etc., for the purpose of study, preparation, and guidance. However, students from any college affiliated with Swami Ramanand Teerth Marathwada University may also use this course for examination-oriented preparation and benefit.
This online course has been prepared by Prof. Sachin Khandare while teaching as a Subject Teacher during the academic year 2025–26.
The course contains complete practical problems and their solutions in English Medium. However, the Theory (Notes) has been provided first in English and then in Marathi. The complete notes/material have been created using various online and offline knowledge sources, self-created content, and AI (Artificial Intelligence) wherever necessary. In short, the entire material is not simply copy-pasted content.
Wherever video sessions/lectures are provided in this course, the medium is English, but the teaching/instructions are explained in Marathi (i.e., Medium of Instructions: Marathi). Therefore, students are expected to write the solutions to practical problems in English only. However, students may understand and write the theory part in either Marathi or English, including in examinations.
Disclaimer:
There may be some mistakes/errors/omissions in this course material. In case students suffer any academic loss, marks-related issues, or other disadvantages due to such mistakes/errors, the professor/course creator shall not be held responsible. Therefore, students should use this online course only as a supportive guide for examination preparation and study purposes. Overall, this course has been created strictly for guidance purposes only. Final success and marks completely depend upon the student’s performance/writing in the examination and the evaluation process of the university.
Students can also type and ask doubts/questions within this course, where their names will not be visible anywhere.