Application of IT in Business – Ms Office (English+Marathi Medium & Instructions) As per SRTMU Nanded (NEP 2020)
About Course
ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर येथील बी. कॉम. प्रथम वर्षाच्या सेमिस्टर 1 च्या विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्यासाठी – त्यांना विविध टेक्स्ट आधारित नोट्स, पीडीएफ फाइल्स, विडियोज इत्यादि गोष्टी घरूनच/कुठल्याही ठिकाणाहून इंटरनेट ने जोडलेल्या मोबाइल/कम्प्युटर/टॅब इत्यादि साधनांच्या सहाय्याने, अभ्यास, तयारी आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने पाहता याव्यात असा तयार करण्यात आलेला हा ऑनलाइन कोर्स आहे; तथापी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी या कोर्स चा वापर करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोग करून घेऊ शकतात.
प्रा. सचिन खंदारे सर शैक्षणिक वर्ष – 2025-26 दरम्यान विषय शिक्षक (Subject Teacher) म्हणून शिकवीत असतानाच हा ऑनलाइन कोर्स तयार केलेला असून,
सदरील कोर्स मध्ये English Medium मधून संपूर्ण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि त्यांचे सोल्यूशन्स आहेत. Theory (नोट्स) मात्र अगोदर इंग्रजी मधून व नंतर मराठी मधून अशा दोन्ही पद्धतीने दिल्या आहेत. सदरील संपूर्ण नोट्स या ज्ञानाचे वेगवेगळे ऑनलाइन-ऑफलाइन स्रोत , तसेच गरजेनुसार AI (Artificial Intelligence) वापरुन तयार केलेल्या आणि स्वयंनिर्मित अशा आहेत. (थोडक्यात, संपूर्ण मटेरियल ही Copy-paste नाही)
ज्या ज्या ठिकाणी विडियो सेशन्स/लेक्चर आहेत त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या विडियोज मध्ये माध्यम इंग्रजी च आहे पण मराठी मधून शिकविलेले आहे. (म्हणजेच Medium of instructions: Marathi वापरलेले आहे). त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम्सच्या सोल्यूशन्सचे लेखन ही इंग्रजीतूनच करावे असे अपेक्षित आहे. पण Theory मात्र विद्यार्थी-विद्यार्थीनी ही मराठी/इंग्रजीतून आत्मसात करून (परीक्षेतसुद्धा) लिहू शकतात.
Disclaimer / अस्वीकृती:
या कोर्स मध्ये काही चुका/त्रुटि इत्यादि असू शकतात, अशा चुका/त्रुटि इत्यादि च्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे कुठलेही शैक्षणिक/मार्क इत्यादि नुकसान झाल्यास संबंधित कोर्स तयार करणारा प्राध्यापण जबाबदार राहणार नाही हे लक्षात घेऊनच विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी या ऑनलाइन कोर्सचा आधार आपल्या परीक्षेसाठीची तयारी आणि अभ्यास यांच्यासाठी घ्यावा. एकंदरीत हा कोर्स फक्त आणि फक्त मार्गदर्शक म्हणून तयार केलेला आहे. अंतिम यश आणि मार्क पूर्णपणे परीक्षेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे लेखन आणि विद्यापीठाचे मूल्यांकन यांच्यावर अवलंबून आहे/असते.
या कोर्समध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी टाईप करून शंका/प्रश्न देखील विचारू शकतात ज्यामध्ये त्यांचे नाव कुठेही दिसत नाही.
Online Course to learn and prepare for the ‘Information Technology – Ms Office’ as a subject of B.Com. F. Y. 1st Semester since the Academic Year 2025-26 onwards.
This course is preferrably prepared for DSM’s ACS College, Jintur students, however anyone can join.
Marathi Medium
Academic Year 2025-26 onwards